आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदावर असलेल्या सभापती स्व.राजू पाटील यांचे निधन झाले होते यावदुखड घटने नंतर आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक लागली
यावेळी त्याठिकाणी कोणाची निवड होते याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते.आज झालेल्या सभापती निवडीत सभापती म्हणून काँग्रेस चे आर्णी नगरपरिषद चे प्रथम नगराध्यक्ष अनिल आडे याची निवड करण्यात आली.
काँग्रेस,राष्ट्रवादी चे निवडणुकीत बहुमत होते ते एकत्रच निवडणूक सुद्धा लढले होते.तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेही उमेदवार बहुमताच्या जवळपास निवडून आले त्यामुळे सभापती पदाची चुरस होती.पण आज अनिल आडे यांचा एकच अर्ज असल्याने अनिल आडे यांची
अविरोध निवड झाली यावेळी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व संचालक उपस्थित होते.
