पुणे शहरास शिक्षणाची पंढरी अशी ओळख मिळाली राज्यातून येथे स्पर्धा परीक्षा व इतर अभ्यासक्रमा साठी राज्य व देशभरातुन विध्यार्थी शिकायला येतात याठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत त्यामुळे राज्य व देशातील नामांकित उद्योग येथे आहेत.सांस्कृतिक वारसा जोपासणारे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे आता मात्र वाढती गुन्हेगारी यामुळे पुणे शहराची इलख क्राईम सिटी म्हणून पुढे येते की काय असे वाटायला लागले.
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ वर गोळीबार, करण्यात आला.कोथरुडमधील सुतारदरा भागातील घटना कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर पुण्यातील कोथरुड परिसरात गोळीबार करण्यात आलाय.शरद मोहोळ सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
