मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी सत्ताधारींचं षडयंत्र , शेतकरी दुष्काळाच्या दृष्ट चक्रात मरणाच्या दारावर असताना , ” गरीब राज्याचे श्रीमंत मंत्री ” जाणीवपूर्वक आपल्या वक्तव्याने विद्वेष पसरवून महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचा पाप वाचाळवीर नेते करत आहे असा गंभीर आरोप घेत वाचाळ नेत्यांचा
शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष यांनी त्यांच्या शब्दात चांगलाच समाचार घेतला.
४ / १ /२०२४
स्वतःच्या वाढदिवसानिमित्त लावणीचं कार्यक्रम घेऊन जनतेवर जनरल डायर सारख लाठी चार्जचा करण्याचा आदेश पोलीस प्रशासनाला जाहीर रित्या देऊन राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात सहकारी पणन मंत्री असलेले व नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार स्वतःला जनतेचे म्हणतात व आज सेवक जनतेला शिव्या घालतात , अब्दुल सत्तार सह या महाराष्ट्राला लाभलेल्या वाचाळवीर जितेंद्र आव्हाड ,अमोल मिटकरी , नारायण राणे अजित दादा पवार , निलेश राणे , संजय राऊत , लाभलेले हे नेते श्रीमंत राजे छत्रपती शिवरायांच्या व फुले शाहू आंबेडकर यशवंतराव , वसंतराव , वसंत दादा या महामानवांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला लाभलेले हे सर्व नेते शाप असून आपल्या बेताल वक्तव्याने सातत्याने समाजा समाजात विद्वेष कालवण्याचं काम करत असून…….. हे सर्व जाणीवपूर्वक घडविल्या जात आहे.
सत्ताराची भूमिका ही जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या ब्रिटिश अधिकारी जनरल डायर सारखी मस्तीत व ऊनमादखोर या नेत्यांवर अंकुश कोणाचं समाजात उघड माथ्याने सन्मानपूर्वक फिरणारे हे सांड आज समाज स्वास्थ व त्यांच्या वर्तनाने महाराष्ट्र अस्वस्थ करत आहे,……..!
अन महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मीडियापासून तर प्रिंट मीडिया पर्यंत माध्यमांना ब्रेकिंग न्यूज होते जितेंद्र आव्हाडाच्या वक्तव्याने व अब्दुल सत्ताराच्या कृतीने महाराष्ट्रात तीव्र पडसाद म्हणजे महाराष्ट्रात जागोजागी निषेध व्यक्त करत गावाच्या वेशीवर ग्रामपंचायतच्या सदस्य पदाची लायकी नसलेल्या आपल्या भाऊच्या सत्कारासाठी हार घेऊन उभे राहणारे बिनडोक तरुण पिढी आज महाराष्ट्रामध्ये सततची नापिकी कर्जबाजारीपणा मिळत नसलेले शेतमालाला भाव या कारणाने आर्थिक विवेचनेत येऊन दुष्काळाच्या दृष्ट चक्रात मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या व दररोज गळफास घेऊन आपल्या जीवन संपवणाऱ्या हताश शेतकऱ्यांच्या आत्महत्या , बेरोजगारी , अप्रत्यक्ष वाढत चाललेली महागाई प्रशासनातील भ्रष्टाचार , राज्यात वाढलेली गुन्हेगारी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असुरक्षित महिला शैक्षणिक बाजारीकरण प्रशासनाची वाढलेली मुजोरी मध्ये होरपळून निघणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजूला पडावं म्हणून समाज श्रद्धेच्या मानबिंदू अस्मिता व अस्तित्वावर शब्दाने घाव घालायची व समाजा समाजातील तेढ निर्माण करून जाती धर्माच्या नावावर २०२४ च्या लोकसभेची साखर पेरणी ची लागवड करण्याच सत्ताधारी डाव असून हे सर्व थंड डोक्याने नियोजित कार्यक्रम असून हे डाव आपण ओळखले पाहिजे जात , धर्म , पंथाच्या नावावर लोकांना भावनिक करून विकासाच्या नावावर प्रश्न करायला सर्वसामान्यांना वेळच मिळू द्यायचा नाही राजकीय रणनीतीचा भाग असून मूळ प्रश्नांना बगल देण्याचा हा षडयंत्र सत्ताधार्यांचा माध्यमातून प्रसारमाध्यमातून पसरविल्या जात असून आज राज्यामध्ये शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा नाही अतिवृष्टीची मदत नाही अवेळी झालेल्या पावसाची मदत नाही विज नाही ,, शेतकरी नैसर्गिक आपत्तीत होपळून निघतोय या प्रश्नांना निरपेक्ष न्याय देण्याऐवजी आज हे नेते महाराष्ट्राला चुकीचे वक्तव्य करून जातीय हिंसाचार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तो सर्वसामान्य लोकांनी या लायकी नसलेल्या नेत्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून सामाजिक सलोखा जपायला हवं ,…………..!!
५/१/२०२४
( ममता वात्सल्य फार्म हाऊस वागद इजारा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ)