विदर्भाची मीरा म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या संत अलकाश्री यांच्या मधुर वाणीतून आर्णी येथील भाविक व राम भक्तांसाठी ‘भजन संध्या व संगीतमय सुंदरकांड (अर्थासाहित) सादर केल्या जाणार आहे या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन आर्णी येथील आध्यत्मिक ज्ञानयज्ञ समितीच्या वतीने कृषि उत्पन्न बाजार समिती (टी.एम.सी.) पाण्याच्या टाकीजवळ शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ ला सांयकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती लक्ष्मीकांत राठी यांनी दिली आहे.
या धार्मिक अलौकिक कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्त व आर्णी
शहर व परिसरातील महिला,पुरुष,युवक,युवती,अबाल वृद्धांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आध्यत्मिक ज्ञानयज्ञ समिती च्या वतीनेकरण्यात आले आहे.
