‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ ही म्हण महाराष्ट्रात आपल्या थोर संतांनी दिली. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांनी भुकेलेल्या माणसास अन्न, तहानलेल्याना पाणी आणि जब गर्जूस निवारा देऊन सेवा करण्याचा सोपा वाटणारा पण तेवढाच कठीण मार्ग सांगितलं आहे. आजच्या व्यस्त जीवनात तरुण पिढी मोबाईल च्या नादात डांग झाली आहे तरुण वयात मौज मजेत दिवस घालवायची हा सर्वसाधारण अलिखितनियम झाला आहे पण यास अपवाद ठरला तो घाटंजी येथील तरुण सूरज हेमके राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना केवळ प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू याची प्रेरणा घेत घाटंजी शहरातील निराधार,दिव्यांग फूट पाथावर
राहणाऱ्या गरीब गरजू लोकांना ‘अन्नदानाच’ उपक्रम सुरू केला
सुरवातीला बरेच अडथळे निर्माण झाले पण सेवेच्या जिद्दीने व मानव सेवेच्या ध्यासाने झपाटलेला सूरज हेमके याने सेवेत कुठंच खंड पडू दिला नाही पहाता पहाता आज 2305 दिवस या अन्नदान कार्यास झाले सुरजला या कामी त्याचे वडील आई व पत्नीचा मोठा आधार मिळाला आपला मुलगा कुठंतरी समाजाच्या उपयोगी पडतो हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते.सूरज ला आज शहरातील अत्यन्त संवेदनशील मनाचे दाते पुढे येऊन मदत करायला लागले आपल्या जिवात जीव असे पर्यंत बच्चू भाऊ कडू यांचा आदर्श कायम ठेवत सेवा करणारअसल्याचे सूरज सांगतो
जेव्हा कधी आपल्या घरात सण उत्सव असतो तेव्हा घरोघरी गोडा धोडाचे पक्वान्न असतात हा विचार करून सूरज निराधारांच्या व रस्त्यावरच्या गरीब गरजू व मनोरुग्णांचा साठी शिरा,श्रीखंड,बासुंदी,लाडू,पुरन पोळी देत असतो
या कार्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विलास पवार याच मोठं सहकार्य लाभले.
सूरज च्या कामाची दखल घेत बच्चू कडू हे राज्यमंत्री असतांना वेळात वेळ काढून घाटंजीला पोहचले आणि त्यानी सृरज च्या कामाचे कौतुक केले.
सूरज च्या काम विविध वर्तमान पत्रातून सुद्धा प्रकाशित झाले आहे
सूरज च्या या महान कार्यास मांनाचा मुजरा व बोल महाराष्ट्र च्या शुभेच्छा…
