लोकसभेची तयारी सर्वच पक्ष करत असताना भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा व लोकसभा जिल्हा निहाय बैठकांचा धडाका लावला असून त्यादृष्टीने अमरावती मध्ये अमरावती लोकसभेच्या तयारी साठी अमरावतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे या बैठकीला गेले नाही यापूर्वी देखील भाजप ने बोलविलेल्या मुंबईत पार पडलेल्या बैठकीस आमदार बच्चू कडू गेले नव्हते.आज एका वृत्त वाहिणीस दिलेल्या मुलाखतीत अंदाजे बच्चू कडू म्हणाले की ‘त्यांचे काम असले की बैठकीला बोलवायचे ‘चहा पाणी करायचे पण मित्र पक्षांना के या बाबत भाजप आपली भूमिका स्पस्ट करत नाही’.
काम झाले की रामकृष्णहरी असा प्रकार आहे.प्रहार जनशक्ती पक्षाची राज्यात टाकत आहे प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाची मोठी ताकत आहे. दोन नगर पंचायत सुद्धा प्रहार च्या ताब्यात असून शेकडो ग्रामपंचायत वर प्रहार ची सत्ता आहे याठिकाणी विकासासाठी निधी सरकार देत नाही म्हणून आम्ही ‘तटस्थ’ रहाण्याचा निर्णय असल्याचे मेन्शन’ करून भाजप चे टेन्शन वाढवले आहे
भाजप साठी जशी लोकसभा महत्वाची आहे तशी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे असेही बच्चू कडू म्हणाले.
आमचे समदजन झाले नाही तर ‘गेम’ करू असे सांगून अप्रत्यक्ष कडू यांनी भाजप ला टोला लगावत इशारा दिला आहे.
