प्रतिनिधी शिरूर पुणे
राज्य मराठी पत्रकार परिषद 2024 चे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न..!
राज्य मराठी पत्रकार परिषद २०२४दिनदर्शिका मोठ्या थाटात शिरूर विधानसभा आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते शिरूर येथे संपन्न झाला यावेळेस राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर तालुका अध्यक्ष एकनाथ थोरात उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात, शुभम वाघचौरे, संदीप ढाकुलकर, इमरान काजी उपस्थित होते. यावेळेस बोलताना आमदार अशोक बापू पवार म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार जीवाचे रान करून सर्व माहिती समाज माध्यमाचे काम करतो, त्यांच्या या कार्याला आमचा नेहमीच सलाम आहे. शासन स्तरावर पत्रकार बांधवांसाठी विमा पॉलिसी आणि भविष्यात पत्रकारांसाठी पतसंस्था उभारण्यासाठी शासन स्तरावर बाजू असे आश्वासन आमदार अशोक बापू पवार यांनी दिले. आणि सर्व पत्रकार बांधवांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
