मनोपुर ते मुंबई असा भारत जोडो न्याय यात्रेस राहुल गांधी यांनी सुरुणकेली असून यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश व उत्साहाचे वातावरण तयार झाले असून महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे समरोपाची सभा यशस्वी होण्यासाठी काँग्रेस कमिटी चे जिल्हा सरचिटणीस युवा नेते जितेंद्र मोघे हे अथक परिश्रम घेत असून आर्णी तालुका पिंजून गावा गावात कार्यकर्ते युवक,बेरोजगार,शेतकरी, शेतमजुरांची भेट घेत समस्या जाणून घेत जितेंद्र मोघे यांनी आगामी निवडणुकीचे राणशिंग फुंकले आहे.राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा इतिहास राहणार असून सत्ताधारी भाजप ला सत्तेवरून पाय उतार व्हावे लागेल असे मत जितेंद्र मोघे हे व्यक्त करत आहेत.
याच यात्रेच्या पार्श्वभुमीवर आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे युवा नेते जितेंद्रभाऊ मोघे यांच्या नेतृत्वात आज आर्णी तालुक्यातील जांब येथे या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व नागरिकांच्या घरोघरी जात त्यांच्याशी संवाद साधत. गावातील अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या तर यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. गावात यात्रेचे आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले. तर गावकऱ्यांनी यात्रेतील सहभागी मंडळींशी विविध विषयांवर चर्चा केली.
प्रसंगी यात्रेत राजीव विरखेडे, सुनिलभाऊ भारती, राजुभाऊ गावंडे, अजितभाऊ राठोड, विनोदभाऊ पंचभाई, गजाननभाऊ राठोड, धिरजभाऊ गांवडे, आसीफभाई शेख, गणेशभाऊ राठोड , आशिषभाऊ राठोड, विश्वनाथभाऊ जाधव, दिनेशभाऊ पवार, राजेशभाऊ चव्हान, विजयभाऊ चव्हान, प्रकाशभाऊ चव्हान, सचिन भाऊ पवार, देविदास भाऊ चव्हाण, सुरेशभाऊ आडे, दशरथ भाऊ तायडे, उत्तमभाऊ आडे, चेतन भाऊ राठोड, योगेश भाऊ आडे, भारत भाऊ आडे,अर्जुन भाऊ आडे, गणेश भाऊ भरवडे , नितेश भाऊ पवार, राजूभाऊ राठोड, चंदन भाऊ पवार आदि सहभागी झाले होते. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते जितेंद्र मोघे याना सर्वच स्तरातून प्रचंड प्रतिसाद मुळात असून कार्यकर्ते सुद्धा जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.