शरीरात श्वास असेपर्यंत शेतकऱ्यांच्या न्याय , हक्कासाठी लढणार , हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय—– शेतकरी नेते मनीष जाधव
८/२/२०२४
दिनांक –५ /०२ /२०२४ —-, च्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी खाजगी होणाऱ्या कापसाच्या खरेदी मध्ये हमीभावापेक्षा बाजारात कमी दराने घेणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश गृह विभागाला दिले हे शासन निर्णय सर्व प्रसार माध्यमात फिरत आहे जर कापसाच्या किंवा इतर अन्नधान्याच्या हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात खाजगी व्यापाऱ्याकडून खरेदी विक्री व्यवहार होत असेल तर अशावेळी मंदीच्या काळात बाजारातील संरक्षण शेतकऱ्यांना देण्याकरिता , ते खरेदी करण्याची हे प्रचलित कायद्यानुसार नुसार हमीभावाने नैतिक जबाबदारी ही राज्य शासनाची असते बाजार भाव मध्ये कापसाचे जे दर दबावात आले मंदी आली याचं जर आपण अवलोकन केलं तर केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने निर्यात बंदीचा कृषिद्रोही शासन निर्णय घेऊन आयात व निर्यातीचे धोरण राबविले व राज्य शासनाने साठाबंदी कायद्याचे वापर केल्यामुळे याच परिणाम कापसाचे दर पडण्यामध्ये कारण ठरले केंद्र शासनाच्या मुक्त आयात धोरणाने पाम तेल सरकीचे तेल व सरकीचे ढेप यांचे भाव पडले आयातीमुळे रुईच्या गाठीचे भाव देखील पडले हे सर्व भाव पडण्याचे पाप हे जर केंद्र शासनाचे असेल तर राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे पाप आपल्या सरकारवर येऊ नये म्हणून व्यापाराला दोषी ठरवण्याचे पाप करत आहे व अशा पद्धतीचं विधान करत असेल तर हे विधान अत्यंत निषेधार्य असून या विधानाचा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध करतो त्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्या विषयी एवढी कळवळा व चिंता असेल तर त्यांनी राज्यामध्ये हमीभावाचे खरेदी केंद्र तात्काळ तालुका निहाय जिल्ह्यात चालू करावे कारण राज्यात पांढऱ्या सोन्याची खान म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे व तसेही राज्य शासनाला जमत नसेल तर त्यांनी हमीभाव व बाजारातील कापसाचे प्रचलित दरातील तफावत विचाराधीन घेऊन ही रक्कम त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्याव अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली दिनांक –१/ ०२ /२०२४ , ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पणन विभागाकडे व व्यवस्थापकीय संचालक भारतीय कापूस महामंडळाकडे मागणी केली जिल्ह्यात कापूस उत्पादकाची होत असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी तातडीने केंद्र शासनाच्या आधारभूत हमीभाव ( CCI ) सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्र चालू करण्यात याव आमच्या विधायक मागणीची दखल न झाल्यास आम्ही नागपूर — तुळजापूर हायवे वर उतरून रास्ता रोको करून या विधायक मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा गर्भित इशारा दिला होता याच आंदोलनाचा धसका घेत शासन व प्रशासनाने दखल घेऊन दिग्रस तालुक्यामध्ये सीसीआयचे खरेदी केंद्र दिनांक –७ /०२ /२०२४ चालू केले आहे हे खरेदी केंद्र CCI प्रत्येक तालुका निहाय चालू करण्यात यावे कारण भाव वाढीच्या प्रतीक्षेत अजूनही शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे कापूस खरेदी केंद्र चालू करण्याबाबत घेतलेला शासन व प्रशासनाने निर्णय मी शेतकऱ्यांना समर्पित करतो हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असून सीसीआयचे खरेदी केंद्र चालू झाल्यास शेतकऱ्यांना ( ७०२० ) रुपये प्रति क्विंटल भाव कापसाला हमीभावानुसार मिळेल व खाजगी खेडा खरेदी पद्धतीत होणारी लूट थांबेल…….
जिल्ह्यात सीसीआयचे माध्यमातून — ७ कापूस खरेदी केंद्र चालू करण्याचा विचाराधीन असून त्यामध्ये
दिग्रस, महागांव व यवतमाळ येथे केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु
यवतमाळ, दि.६ (जिमाका) : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत यवतमाळ जिल्ह्यातील सात केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. याव्यतिरिक्त दिग्रस, महागांव व यवतमाळ या तीन केंद्रांवर कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे, असे कापूस पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, घाटंजी, राळेगांव, वणी, खैरी, सिंदोला आणि पांढरकवडा या सात कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे.
या व्यतिरिक्त सीसीआयमार्फत जिल्ह्यातील दिग्रस, महागांव व यवतमाळ या तीन केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे.
सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या विधायक लढ्यामध्ये आमच्यासोबत , अशोक भाऊ धाडवे , मोहदी , विकास भाऊ राठोड , काटखेडा सुरेश भाऊ देशमुख शेंबाळपिंपरी शिवाजीराव तोरकड कोंडी संतोष जाधव खंदारे काका सुरोशे यास अनेक शेतकरी या लढ्यात सहभागी होते
०८ /०२ /२०२४