प्रलंबित समस्यांसाठी प्रहार शिक्षक संघटनेचे मा. मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी, जि. प.यवतमाळ यांना निवेदन
यवतमाळ जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मा मुख्यकार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले
प्रहार शिक्षक संघटना जिल्हा यवतमाळ च्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदिप डंभारे यांच्या नेतृत्वात
निवेदन माceo आणिमा.Eo ह्याना देऊन खालील विषयांवर चर्चा करण्यात आली
२)आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना २००३ च्या शासन निर्णयानुसार एक वेतन वाढ देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
२)आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे DCPS तथा NPS कपात रक्कम जमा करणे कामी संबंधित जिल्हा परिषद ला तातडीने पत्रव्यवहार करून कार्यवाही करण्यात यावी.
३)२०२२ ला वणी तालुका अंतर्गत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे वेतन तातडीने अदा करण्यात यावे.
४) स्वयंसेवक मानधन एक ते दीड महिन्यापासून पंचायत समिती स्तरावर प्रलंबित असून तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
५)विषय शिक्षकांची पदोन्नती १६ ते १७ तारखेच्या आत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी पागोरे साहेबांनी दिले.
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदिप डंभारे, जिल्हा सचिव अमोल गोपाळ, अमोल घुमे (तालुका अध्यक्ष यवतमाळ)संतोष चौधरी, (ता. सचिव घाटंजी ) लोखंडे सर(कोषाध्यक्ष घाटंजी ), इशान हांडे ता. उपाध्यक्ष यवतमाळ) हे उपस्थित होते