आर्णी येथे सुरू असलेल्या सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेल्या बाबा कंबलपोष उर्स निमित्ताने जवळ येथे सर्वधर्मीय भविका कडून शाही संदल काढण्यात आला.
या निमित्ताने आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती व आर्णी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजीव विरखेडे यांनी संदल मध्ये सहभागी होऊन लंगर ची सेवा दिली यावेळी कचरसेठ उर्फ रउफ शेख,युनूस शेख,राहील शेख,रहेमान शेख,इमरान शेख,आलम पठाण,रवी जिचकार,पंकज धाये,धीरज गावंदेव जवळा येथील इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
राजू विरखेडे यांनी जवळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन सुद्धा केले.
