7k Network

मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचारा विराधात प्रहारआक्रमक आरे रोड कॉलनी शौचालय निकृष्ट बांधकाम प्रकरण

*मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार संपवणार प्रहार
*आरे कॉलनी येथील रोड आणि शौचालय येथे झालेले निकृष्ट दर्जाचे काम*
प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने वंदनीय आमदार श्री. बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. अजय तापकीर संपर्क प्रमूख महाराष्ट्र राज्य, ऍड. मनोज टेकाडे महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी प्रमुख, श्री. सुरेश चक्रे, ऍड.विद्या ताई नाईक मॅडम समाजसेवक, श्री.मच्छिंद्र जाधव उत्तर पश्चिम जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आरे कॉलनी येथील रोड आणि शौचालय येथे झालेले निकृष्ट दर्जाचे कामा निमित्त एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे दिंडोशी विधानसभा उपाध्यक्ष श्री. मिलिंद श्रीराम गवई, वॉर्ड क्रमांक ५२ अध्यक्ष श्री. प्रविण तलीकोटी, वॉर्ड क्रमांक ४० अध्यक्ष श्री. कृष्णा विश्वकर्मा, वॉर्ड क्रमांक ४० उपाध्यक्ष श्री काशिनाथ सागरे, वॉर्ड क्रमांक ४० सचिव श्री. पंकज सोनी, प्रहार सैनिक श्री. अमर गौड, प्रहार सैनिक श्री. मंगेश मोहिते, प्रहार सैनिक श्री.लिंबराज खटके, प्रहार सैनिक श्री.नवीन मर्चांदे, भांडुप विधानसभा अध्यक्ष श्री.दादासिंह जाधव, घाटकोपर विधानसभा अध्यक्ष श्री.प्रशांत मुके, श्री.सोईल गोरेगांव पश्चीम विद्यार्थी पदाधिकारी, प्रकाश आईवळेप्रहार अपंग क्रांति आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेचे उत्तर पश्चिम जिल्हा आणि दिंडोशी विधानसभा मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या वेळी महानगरपालिकेचे आधिकारी यांनी लिखित स्वरूपात पत्र देवुन १४/०२/२०२४ रोजी संयुक्त बैठक आधीकारी, पक्षाचे पदाधिकारी, कॉन्ट्रॅक्टर लावणार असे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने आंदोलन तात्पुरत स्तागित केले आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!