7k Network

शेतकरी प्रश्नावर अहमदनगर प्रहार आक्रमक,जिल्हा कृषी अधिकाऱ्यास विचारणार जाब

नेवासा बु , सानई , चांदा, घोडेगाव ह्या चार महसुली मंडळांमध्ये पंतप्रधान पिक विमा योजना खरीप 2023 चा 25% अग्रीम नुकसान भरपाई मिळालेली नाही . तसेच ज्या मंडळांचा 25 % अग्रिम पिक विमा मिळाला त्याची उर्वरित रक्कम मिळ्ण्याची चिन्हे दिसत नाहीत . त्यामध्ये मुख्यतः सोयाबीन, कपाशी, , तूर ,भुईमुग ह्या पिकांचा समावेश आहे . ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी कडून तांत्रिक अडचणी दाखवून विमा नाकारण्यात आला आहे . कृषि विभाग तहसिल तथा जिल्हाधिकारी कार्यालय हे देखील अधिसूचना काढण्यात दिरंगाई करीत आहेत . ह्या सर्व परिस्थितीची गंभीर दखल नेवासा तालुका शेतकरी संघटना आणि प्रहार जन शक्ती पक्षाने घेतलेली असून त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवार दि 9 फ्रेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वा जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर आणि जिल्हा कृषि कार्यालय येथे जाणार आहेत . त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अहमदनगर सोशिअल मीडिया प्रमुख संजय वाघ यांनी केले आहे .

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!