आर्णी पोलीस स्टेशन आवारात तत्कालीन ठाणेदार पितांबर जाधव यांनी थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन भारताचे दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे.अबुल कलाम अभ्यासिका सुरू केली होती येथे आर्णी शहरातील व परिसरातील अभ्यासू विध्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात.
या अभ्यासिकेला येथील प्रहार चे माजी राज्य संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे यांनी पुस्तकांची भेट पाठवली आर्णी चे कर्तव्यदक्ष ठाणेदार केशवराव ठाकरे यांना पुस्तकं सोपविताना
पुस्तके भेट देताना प्रहारचे कार्यकर्ता ओंम प्रमोद कुदळे
गौरव टाले वैभव चव्हाण पवन वंजारी वैभव भोंगे अभिषेक कुकडे ओंकार चव्हाण आदी मित्र मंडळी उपस्थित होती.
