“अजय बारस्कर यांचा खरा चेहरा समोर,,
प्रतिनिधी पुणे
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तसेच प्रहार वारकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष स्वयंघोषित असे अजय महाराज बारस्कर यांना मनोज जरंगे पाटील यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आमदार बच्चू कडू यांच्या आदेशाने तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. पुणे जिल्हा तसा राष्ट्रवादी आणि भाजपचा वर्चस्व असलेला जिल्हा आहे, आमदार बच्चू कडूच्या सेवा, संघर्ष, त्याग, समर्पण या तत्त्वावर चालत गौरव जाधव, नयन पुजारी, उमेश महाडिक, नौशाद शेख, संदीप ढाकुलकर, संतोष आप्पा साठे अशा अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पुणे जिल्ह्यात प्रहार चे रोपटे मोठ्या प्रमाणात फुलविले होते. अजय बारस्कर यांच्या आधी गौरव जाधव स्विय सहाय्यक आमदार बच्चू कडू त्यांच्यावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी होती. गौरव जाधव यांनी प्रामाणिक कार्यकर्ते सोबत घेत पुणे जिल्ह्यात प्रहार पक्ष मोठ्या प्रमाणात वाढविला होता . बारस्कर यांच्या नियुक्तीनंतर पुणे जिल्ह्यामध्ये पक्षाला उतरती कळा लागली. आणि पुणे जिल्ह्याला रसातळास नेण्याचे कार्य अजय बारस्कर यांनी केले. कोणत्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता त्यांनी परस्पर निर्णय घेण्याचा धडा का लावला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पण आमदार बच्चू कडू यांनी नियुक्ती केली असल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या विरोधात बोलू शकत नव्हते. नयन पुजारी, उमेश महाडिक, नौशाद शेख, संतोष आप्पा साठे, संदीप ढाकुलकर असे अनेक कार्यकर्ते दिवस-रात्र न बघता गौरव जाधव यांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे काम करीत होते. पण अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला बाजूला ठेवून बच्चू कडू यांचा पुणे जिल्ह्यात दौरा असताना सुद्धा प्रोटोकॉल प्रमाणे पदाधिकाऱ्याला महत्व देत नव्हते आणि तशा सूचनाही देत नव्हते. त्यांच्या अशाच कार्यामुळे अनेक सच्चे कार्यकर्ते पक्षापासून दूर झाले. काल त्यांच्यावर झालेल्या बडतर्फीच्या कारवाईनंतर अनेक कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. कर्माची फळे इथेच भोगावे लागतात हे या घटनेवरून दिसून येते.
