महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसागणिक नव्या नव्या घडामोडी घडताना दिसतात
एसच एक प्रसंग बारामतीतील नमो महा रोजगार मेळावा आयोजित केला आहे या कार्यक्रम शासकीय असल्याने कार्यक्रम पत्रिकेत सत्ता व विरोधातील सर्वच नावांचा समावेश असणे क्रमप्राप्त असते हा कार्यक्रम बारामतीत असल्याने व राज्याचे जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे अध्यक्ष राज्यसभा सदस्य शरद पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आले नव्हते.त्यावर शरद पवार यांनीच मला कुठल्याही शासकीय कार्यक्रमास बोलउ नये सांगितल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले होते.पण आपण अस कुठही म्हटलं नाही हे शरद पवार यांनी स्पस्ट केल्यावर ऐनवेळी पुन्हा कार्यक्रम पत्रिकेत शरद पवार यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. ही सरकारची हुशारी की प्रशासनाची लाचारी आहे अशी चर्चा होतांना दिसत आहे.