संदीप ढाकुलकर
“शिरूर लोकसभा मतदारसंघात एक अनार सौ बीमार अशी परिस्थिती,,
जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्या गटाची जागा जवळपास विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना निश्चित आहे असे खात्रीलायक वृत्त आहे. तर हीच जागा महायुतीकडून अजित पवार गटाला देण्याचे संकेत आहे. या जागेसाठी शिंदे गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यातच फडणवीसांचे निष्ठावान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सुद्धा अमोल कोल्हे विरोधात दंड थोपटले आहे पक्षाने आदेश दिल्यास मी सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असे महेश लांडगे यांनी म्हटले आहे. त्यातच माजी आमदार विलास लांडे यांनी सुद्धा अजित पवार आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी अपेक्षा करून बसले आहे. मा.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे त्यामुळे ते सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उभे राहू शकतात. त्यातच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा पक्ष आदेश दिल्यास राष्ट्रवादी चिन्हावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. एकंदरीत महा विकास आघाडीच्या विद्यमान खासदार यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार शोधण्यास सध्या तरी दम छाक होत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता शिरूर लोकसभा ही अत्यंत चुरशीची होईल यात मात्र शंका नाही. एकंदरीत महायुतीत लोकसभेच्या या जागेसाठी ‘एक अनार सौ बिमार, अशी परिस्थिती झाली आहे. या सारीपाटाच्या डावात नेमके कोणाला संधी मिळणार ही वेळच सांगू शकते.
