यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महा विकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेले संजय देशमुख यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार यांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार हे यवतमाळ येथे आले असता आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांची त्यानी भेट घेतली दोघांच्या मध्ये बझड द्वार सुमारे अर्धा तास चर्चा झाली सादिक शेख यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आर्णी शहराध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात येणार असल्याचे वृत्त कालच बोल महाराष्ट्र ने प्रकाशित केले होते. मात्र आज सादिक शेख व आमदार रोहित पवार याच्यात झालेल्या चर्चेतून सादिक शेख याच्यावर पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येऊ शकते.
