महाराष्ट्राच्या संविधानाला जे बाबासाहेबांनी लिहले ते लोकशाहीची राज्य घटना बदलुन भारतीय जनता पक्षाला स्वतःची घटना आणायची आहे.म्हणून त्यांचा एक मंत्री तसे वक्तव्य जाहीरपणे करतो. सर्व यंत्रणांचा वापरत करून भाजपात या नाही तर तुरुंगात जा अशी दमदाटी देशात सुरू आहे.आपली लढाई ही लोकशाही वाचविण्यासाठी असून यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख यांना विजयी करा असे आवाहन शिवसेना उधब बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.शिवसेना उबाठा गटा कडून मशाल या चिन्हावर संजय देशमुख वाशिम-यवतमाळ लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आज त्यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यात आला यावेळी यवतमाळ च्या पोस्टल ग्राउंड वर झालेल्या विराट सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.
