निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत कोण काय बोलून जाईल व त्यांच्या बोलण्यामुळे काय परिणाम होतील सांगता येत नाही
आजवर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधाना मुळे पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागले होते. पण आता सत्ताधारी भाजप नेते सुद्धा काहीं विधानामुळे चर्चेत आले आहेत. भाजप च्या दक्षिणेतील एका केंद्रीय मंत्र्याने संविधान बद्दलवण्यास ४०० पार चे बहुमत हवे आहे असे म्हटल्याने विरोधकांनी मोठा गदारोळ केला. चंद्रपुरातील एका सभेत उमेदवार मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करतांना एक अभद्र उदाहरण दिल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले .आता अमरावती च्या खासदार व लोकसभा उमेदवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मोदींची लाट आहे या भ्रमात राहू नका,कारण २०१९ च्या निवडणुकीत मोदी लाट असतांना आपण अपक्ष निवडून आलो होतो असे त्या ओघात बोलून गेल्याने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहे.कारण मोदी यांच्या चेहऱ्यावर व मोदी की गॅरंटी यावर देशभर भाजप निवडणूक लढवत आहे.