अमरावती लोकसभेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आली असून भाजप महायुती कडून खा.नवनीत राणा तर काँग्रेस कडून महा विकास आघाडी चे उमेदवार आमदार बळवंत वानखडे आहेत त्यात प्रहार जनशक्ती पक्षाने म्हणजेच आमदार बच्चू भाऊ कडू यांनी आपला उमेदवार दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने ही लढत तिरंगी झाली असून या तिरंगी लढतीत प्रहार ला मिळणाऱ्या जोरदार प्रतिसादामुळे दिनेश बुब यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे मतदार संघात बोलले जात आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात आमदार बच्चू भाऊ कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघ व प्रहार चे आमदार राजकुमार पटेल यांच्या धारणी मतदार संघाचा समावेश आहे.शिवाय दर्यापूर मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघात प्रहार संगटनेची चांगली ताकत आहे. काँग्रेस मधील नाराज व शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नाराज मतदार प्रहार कडे झुकताना दिसत आहेत याशिवाय भाजप मध्ये देखील अंतर्गत खदखद प्रहार च्या विजयास कारणीभूत ठरणार असल्याची चर्चा आहे
दिनेश बुब याचं आरोग्य सेवेत मोठे काम आहे शिवाय सर्वच पक्षात त्यांचे जिव्हाळ्याचे समंध आहेत आणि एक वेळ याच मतदार संघात बच्चू भाऊ कडू यांचा निसटता पराभव अजूनही अमरावतीकर विसरले नाहीत त्यामुळे दिनेश बुब यांना संधी म्हणजे बच्चू कडू यांना संधी असे मत मतदार संघात तयार झाल्याने दिनेश बुब याचा विजय निश्चित मानल्या जात आहे.