*आर्णी बसस्थानकात अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीचा ईसमाकडुन विनयभंग
नागरीकांनी दिला नराधम ईसमाला चोप
आर्णी पोलिसात ५० वर्षीय ईसमावर गुन्हा दाखल
आर्णी:- आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी जवळा येथे पेपराला जाण्यासाठी वडीलांनी आर्णी बसस्थानकात सोडले बस येण्याची वाट पाहत असतांना अमरावती किनवट या बस मधुन आरोपी दिपक कोडंबा खिल्लार वय ५२ वर्ष हा उतरला आणी त्या अल्पवयीन मुली जवळ जावुन एक सारखा तिच्याकडे पाहात तेव्हा त्या ईसमाचे हावभाव लक्षात येताच तिने बसस्थानकाच्या बाकावर बसली तेव्हा तो सरळ तिच्या समोर बसुन अश्लिल हावभाव केल्याने तीला सहन झाले नाही तीने त्या ईसमाला जोरात ओरडुन बस स्थानकात कल्ला झाल्याने नेमके काय झाले यावर कर्तव्यावर असलेले वाहतुक नियंत्रक यांनी त्या मुलीला काय झाले याची विचारना केली परंतु ती विद्यार्थीनी काही एक न बोलता जोराने रडत बसस्थानकाच्या बाहेर येउन आपल्या वडीलाला फोन करुन सर्व किस्सा सांगीतला तेव्हा तो ईसम दिसताच क्षणी काही युवकांनी दिसता क्षणी त्याला चांगलाच चोप देत त्याला आर्णी पोलीस स्टेशन येथे नेऊन त्या नराधम ईसमावर अश्लिल चाळे केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक मस्के पोलिस शिपाई गणेश राठोड,मिथुन जाधव करीत आहे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे विध्यार्थी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.