*शिवसेनेचे जल समाधी आंदोलन यशस्वीरीत्या संपन्न*
*जळकोट प्रतिनिधी :- विश्वनाथ शिंदे*
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आतनूर येथील तेरु नदीवर पुलाचे काम जवळपास मागील 2 महिन्यांपासून सुरू आहे. पूर्वीचा चांगला असलेला पूल ऐन पावसाळ्यात पाडण्यात आला आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी पूल बांधला आहे परंतु या पर्यायी पुलाची उंची खूप कमी आहे त्यामुळे मागील 2 महिन्यांपासून या पुलावरून पाणी जात असल्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत होती.
आतनुर व पंचक्रोशीतील सामान्य जनतेला, शाळेतील विद्यार्थी, रुग्ण व प्रवासी सर्वांचीच गैरसोय होत आहे. पुलावरून पाणी सतत वाहत असल्याने आतनुर व इतर गावांचा संपर्क तुटला होता, सणासुदीला लोकांना बाजार करण्यासाठी बाजारपेठेला सुध्दा येता येत नाही.
त्यात आतनूर,गव्हाण,चिंचोली,मेवापुर,
मरसांगवी,शिवाजी नगर तांडा,आतनूर तांडा,रामपूर तांडा,डोंगरेवाडी तांडा या गावातील जनतेला याचा खूप त्रास होत आहे.तरी येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे 17 सप्टेंबर पर्यंत या पुलाची उंची वाढवून प्रवाशांची योग्य ती सोय करावी अशी मागणी आम्ही 9-9-2024 रोजी दिलेल्या निवेदनात केली होती तरी सदरील पूल तयार झाला नाही तरी आम्ही या निवेदनात येवढंच सांगू इच्छितो की जोपर्यंत हा पर्यायी पूल तयार होणार नाही तोपर्यंत सदरील होणारे मोठे पुलाचे बांधकाम थांबवावे असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले व सार्वजनिक बांधकाम व
विभागाचे अभियंता कोरडे सहेब यांनी येत्या आठ दिवसात आपल्या मागण्या मान्य करू असे निवेदन तालुका प्रमुख मुक्तेश्वर पाटील यांच्या हातात दिले.
यावेळी महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शिलाताई पाटील,काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती पांडे साहेब,आशिष पाटील राजूरकर,शिवसेना तालुका समनव्यक अभंग मोटे,शेतकरी सेना ता प्रमुख मारोती माने,तालुका आचिव अमोल गुट्टे,उप तालुका प्रमुख देवीसास घोडके,विभाग संघटक गोविंद बारसुळे,पंचायत समिती प्रमुख माधव सोमुसे,राजू जाधव,सौरभ शिकारे,कोंडीबा रेकुळवाड,गणपत वजीरे, रवी पांचाळ,बालाजी येवरे,नितीन सोमुसे,अस्लम मुंजेवार,बालाजी कापसे,रमजान तांबोळी,बाळु सासटे, ऐनोंदीन महागमे,संतोष तेलंगे,हबीब शेख, मारोती बॉईनर,विजय गव्हाणे,रमेश बोडेवार, युसुब फम्बोळी,जैनू आतार,सँतोश बट्टेवार,अफरोज पठाण,माधव कापसे,शिरू बारसुळे,देविदास सोमुसे,पप्पू सोमुसे,मगदूम मुंजेवार, सचिन घोडके,संजय कुंटेवाड, सुनील घोडके,आकाश बेळकुंदे,ज्ञानेश्वर जाधव,मारोती कापडे, बाजीराव कापडे व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.