पिंपळनेर येथे वारकरी संप्रदायाच्या दिंडीच्या साह्याने श्री गणपती विसर्जन……
आज पिंपळनेर येथील श्री आप्पा स्वामी गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन एक आगळ्यावेगळ्या प्रकारे करण्यात आले यामध्ये यावेळी वारकरी संप्रदायाच्या दिंडीच्या साह्याने करण्यात आले गावातील लोकांनी सुद्धा आगळ्यावेगळ्या प्रकारे दिंडीच्या माध्यमातून विसर्जन केल्यामुळे लोकांनी सुद्धा कौतुक केले तसेच श्री आप्पास्वामी गणेश मंडळाच्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये मुलांची बौद्धिक क्षमता, व जिद्द वाढावी यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये लिंबू चम्मच स्पर्धा, मटकी फोड स्पर्धा, पोत्याची शर्यत स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन गणेश उत्सव काळामध्ये मंडळाच्या वतीने करण्यात आले होते व दिंडीच्या सहाय्यामध्ये प्रभात काळी मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले व त्यानंतर विविध स्पर्धेमध्ये विजेता झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव इंगळे महाराज होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मुनेश्वर सर बीड जमदार पोलीस स्टेशन ,आर्णी हे उपस्थित होते व त्यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले तसेच मा अजित पटेल पोलीस स्टेशन आर्णी हे सुद्धा उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मंडळाचे अध्यक्ष दत्ता मोरे सचिव निलेश ढोले, सदस्य विशाल शेळके, स्वस्तिक देवकर ,वैभव गायकी,अनिकेत नांदे किरण मांजरे, सुरेश इंगळे,सुनील इंगळे ,दीपक देवकर ,सोमकांत इंगळे हर्षवर्धन इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक वैभव गायकी यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश ढोले यांनी केले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला