जितेंद्र मोघेंच्या “आता परिवर्तन” दौऱ्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद .
नागरिकांच्या समस्या,अडीअडचणी जाणुन घेत त्यासोडविण्यावर दिला जातोय भर
आर्णी:-
आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये भेट देवून नागरिकांच्या अडीअडचणी,समस्या जाणुन घेत त्या सोडविण्यावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे भर देत असल्याने त्यांच्या “आता परिवर्तन” या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन जनाधार त्यांच्या सोबत असल्याचे पहावयास मिळत आहे.
आदिवासी बहुल असलेल्या आर्णी घाटंजी केळापूर मतदार संघात शेतकरी,कष्टकरी,कामगार,विद्यार्थी,बेरोजगार युवकांच्या अनेक समस्या आ वासून उभ्या असताना त्यात भरीस भर म्हणुन अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे तसेच पूरग्रस्त गावातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले लोकप्रतिनिधी मात्र याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने या पीडित शेतकरी,नागरिकांना आधार देत त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र मोघे यांनी आर्णी मतदार संघातील गावांमध्ये काही महिन्यांपासून गावभेट दौरे आयोजित केले आहेत.त्यामध्ये गावांना भेटी देत गावकऱ्यांच्या अडीअडचणी,प्रश्न शासन दरबारी असलेल्या प्रलंबित समस्या यांची माहिती जाणुन घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये मोघे यांच्या कार्याप्रती आपुलकी निर्माण होवून नागरिक सुद्धा आपल्या समस्या घेवुन त्यांच्याकडे येत असल्याने मोघे यांच्या गावभेट दौऱ्याला जनतेमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असुन आपल्या समस्या केवळ मोघेच सोडवू शकतात अशी जनतेमध्ये जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत असुन .या गाव भेटीमुळे मोघे यांच्यापाठीशी प्रचंड मोठा जनाधार आजमितीला तयार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
आजच्या आतापरिवर्तन दौऱ्या वेळीं रुपेश कल्यमवार, आशीष पाटील लोणकर, अभिषेक पाटील ठाकरे, सहदेव राठोड,माणिकराव मेश्राम, वासुदेवराव मह्हले,सुनील देठे, अमृत पेंदोर,विजय भगत, राजु मुनेश्वर, आशीष भोयर, अक्षय पवार, करुणाकर लिहीतकार
बिलायता येथील सरपंच हनुमंत आडे, विलासराव शिंदे, रंगराव लोहकर, चपंतराव नप्ते, विश्वनाथ ठमके, गोविंदराव लोहकरे, सुभाष गोडघाटे, संदीप पाटील, रघुनाथ पेंदोर, विष्णू पेंदोर, पांडुरंग शिंदे परमेश्वर किनाके, मनीष मंगाम, प्रदीप भगत, रमेश मंगलपवारव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.