अंतरवली सराटी मध्ये आमरण उपोषण करणाऱ्या मराठा आरक्षणाचे नेतृत्व क्रांतिसूर्य मनोज पाटील जरांगे यांनी सूर केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून आज मनोज पाटील यांची प्रकृती बिघडली असून अजूनही मागण्या पूर्ण होई पर्यंत उपचार घेणार नाही असा पवित्रा मनोज पाटील यांनी केला
मनोज पाटील यांना आज उभेही रहाता येत नव्हते त्याना आधारावर उभे रहावे लागल्याने या ठिकाणी उपस्थित मराठा समाज बांधव माता भगिनींना अश्रू अनावर झाले.दिवसेंदिवस सरकार मराठा समाजाचा अंत पहात असल्याने मराठा समाजात सरकार विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे.