आरोग्य सेवेसाठी प्रहार संघटना नेहमीच अग्रस्थानी असते. रुग्ण सेवा हा प्रहार संस्थापक राष्ट्रिय अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी पक्ष संघटनेला दिलेला मूलमंत्र असून जिल्हा प्रमुख वसू महाराज यांना प्रहार चे फिरते रुग्णालय म्हटल्या जाते तर महानगर प्रमुख बंटी भाऊ रामटेके हे देखील आरोग्य दिव्यांग कामगार व सर्व सामन्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत असतात.या दोन्ही पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज अमरावतीत…
जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांना जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीन येथील १५ ते १७वर्षापासून काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना फक्त ८ हजार रु. वेतन देण्यात येत होते त्यामध्ये सुद्धा अनियमतता होती तीन तीन महिने वेतन मिळत नव्हते. त्या संदर्भात सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे या करिता प्रहारच्या जनशक्ती पक्ष वतीने, निवेदन देणात आले. जिल्हा प्रमुख श्री वसु महाराज, बंटीभाऊ रामटेके व इतर उपस्थित होते शल्यचिकित्सक यांच्या कॅबिनमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरच्या वतीने ३ तास ठिय्या आंदोलन केले. जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन आयोग कायद्यानुसार देऊ असे आश्वासन दिले.