- महा युतीतून अधून मधून घुसफूस ऐकायला मिळते पण लगेच वरिष्ठ पातळीवर त्यावर पडदा टाकल्या जातो.आता १५-२० दिवसात महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते.गणेश विसर्जनाच्या व्यसत्तेतूं देखील राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार व प्रचार जोमाने सुरू ठेवला आहे. या योजने मुळे महा युतीतील तिन्ही पक्ष प्रचंड आशावादी आहेत तर म्हणे युतीत जसगा वाटपाचा तिढा सुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
मात्र दुसरीकडे सर्वेक्षणात महा विकास आघाडी व्हे बहुमत येईल असे आकडे समोर आल्याने महा विकास आघाडीत देखील तू तू मै मै सुरू झाली आहे.मुख्यमंत्री आपला असावा असे स्पस्ट मत एका कार्यक्रमात जेष्ठ काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले यावरून वेळ न दवडता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार दंजय राऊत यांनी काँग्रेस चा समाचार घेतला.
कॉंग्रेसला लोकसभेत मिळालेल्या यशात शिवसेनेच्या मतांचा वाटा मोठा असून कोल्हापूर अमरावती व रामटेके ह्या आमच्या जागा आम्ही काँग्रेस ला दिल्या तरीही काही खुम खुमी असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मोठा भाऊ कोण लहान भाऊ लाडका भाऊ कोण हे दिसेल असे म्हणत एकप्रकारे काँग्रेसला गर्भित इशाराच दिला. यावर नाना पटोले यांनी लगेच उत्तर दिले थोरात हे जेष्ठ नेते आहेत त्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास केला गेला यावर संजय राऊत काही बोलले असतील तर त्यांच्या कडे लक्ष देऊ नका असा टोला लगावला यामुळे आघाडीत बोलण्याने बिघडी तर होणार नाही असे चिट निर्माण होत आहे.