7k Network

भारताच्या कारवाई ने चवताळलेल्या पाकिस्तान कडून सीमेवर अंदाधुंद गोळीबार,भारतानेही दिले चोख प्रतिउत्तर….!

काल पाकिस्तान विरुद्ध भारताने कठोर पावले उचलत पाच निर्णय घेतले त्यामुळे पाकिस्तान चवताळला असून पाकिस्तान ने आपल्या सैन्य दलास अलर्ट रहाण्याच्या सूचना दिल्या व अन्नवस्त्र चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.    भारताने अटारी सीमा बंद करून पसक नागरिकांना  व्हिसा रद्द करून भारतातील पाक नागरिकांना देश सोडण्याचा निर्णय घेतला सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू नदी जल करार रद्द करून पाणी रोखण्यासाठी निर्णय घेतला आहे.हा निर्णय सी सी आय आय बैठकीत घेण्यात आला.

 

बिहार मधील मधूमनी येथील जाहीर सभेत बोलतांना पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा देऊन कारवाई चा इशारा दिल्याने पाकिस्तान मध्ये भयाचे वातावरण आहे.

 

काल रात्र भर एल ओ सी लाईन ऑफ कंट्रोल वरून पाकिस्थानी सैनिकांनी अंदाधुंद गोळीबार केला.त्याला चोख प्रतिउत्तर भारतीय सैनिकांनी  दिले.

 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात सद्या संतापाची लाट पसरली आहे. त्यातच भारत सरकारने कडक पाऊले उचलली, तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. अशातच, पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू ठेवला, ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

 

माध्यमांनी सैन्यातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवरून पाकिस्तानी सैन्याकडून हा गोळीबार रात्रभर केला जात होता. तथापि, या हल्ल्यात भारतीय बाजूचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

 

अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, पाकिस्तानी सैन्याने सीमेवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार चालूच ठेवला होता. त्याला भारतीय सैन्याने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप सविस्तर माहिती व दुजोरा देण्यात आलेला नाही. पण, भारतीय सैन्याचे यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे.

 

पहलगाम हल्ल्यानंतर हा गोळीबाराचा प्रयत्न
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे दोन्ही शेजारी देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच ही गोळीबाराची घटना घडली.

 

 

 

 

 

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!