ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी हजारो पर्यटक असताना सीमा सुरक्षा दल व इतर सुरक्षा यंत्रणा कुठं होत्या असा प्रश्न विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला त्यावर सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचे केंद्र सरकारने मान्य केले या पर्यटन स्थळी जून महिन्यात पर्यटकांना परवानगी असते परंतु यावेळी हे स्थळ पर्यटकांना खुले करताना स्थानिक यंत्रणा व केंद्रीय यंत्रणा यांना माहिती दिली गेली नसल्याचे सांगण्यात आले व सुरक्षा यंत्रणेची चूक मान्य करण्यात आली.
राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे असुद्दीन ओवेसी यांच्या सह सर्वच राजकीय पक्षांनी बैठकीत सरकार ने घेतलेल्या सर्व निर्णयास पाठिंबा देऊन भविष्यात घेण्यात येणाऱ्या निर्णयाला देखील पाठिंबा दर्शवला.या सर्वपक्षीय बैठकीत मौन पाळत मृतक पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.