संदीप ढाकुलकर
जुलै अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अरण तीर्थक्षेत्राच्या विकासाचा शुभारंभ….
जयकुमार गोरे, पालकमंत्री
महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या स्मारकांसाठी आणि साधूसंतांच्या धार्मिक स्थळांसाठी शासन निधीची कमतरता भासू देणार नाही. ही आमची ऊर्जास्थाने, शक्तीपीठे असून यांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच संतश्रेष्ठ सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून 24 जुलै च्या अगोदर सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला .
अरण ता माढा येथे आयोजित चंदन उटी कार्यक्रम आणि भक्त परिवाराच्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
आपल्या भाषणात 730 वर्षाच्या धार्मिक परंपरेचा वारसा असणाऱ्या संत सावता महाराजांच्या अरण नगरीचा विकास आजपर्यंत झाला नाही याची खंत व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाला गती दिल्याचे सांगून या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी निशाणा साधला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मठिकाणा चा विकास करण्यासाठी दहा एकर क्षेत्र विकत घेत 145 कोटी रुपये ची तरतूद केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कडगुण या जन्मस्थळाचेही स्मारकांमध्ये रूपांतर करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे .छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांच्या स्मारकाचा विकास करणे आपल्या शक्ति स्थळांचा ऊर्जास्थानांचा विकास करणे यासाठी शासन कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले .
एका सर्वसामान्य घरातील ज्याचा कारखाना नाही ,मोठा उद्योग नाही, अशा एका रेशन दुकानदाराचे पोरगं चार वेळा आमदार झालं आणि आता मंत्री झालं याचे श्रेय फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचेच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
प्रमुख अतिथी तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांनी अरणच्या तीर्थक्षेत्रासाठी पाहिजे तेवढा निधी देऊ, पैशाची काळजी करू नका. सावित्रीबाई फुले स्मारकास सुद्धा निधी मंजूर केला आहे. महात्मा फुले यांच्या भिडे वाड्याचा प्रश्न कोर्टातून सरकारच्या बाजूने सुटला आहे. यामुळे भिडेवाड्याचा विकास यापुढे होणार आहे. महात्मा फुले यांचा राहते घर” फुले वाड्या” साठी 100 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे. ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य नागरिक सक्षम झाले पाहिजेत असे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि राज्य सरकार यांचे धोरण आहे .ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून पूर्वी फक्त दहा विद्यार्थ्यांना मिळणारी परदेश शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती वाढवत वाढवत आता 100 वर आणली आहे .त्यासाठी असणारी 20 लाख रुपये मर्यादा 40 लाखापर्यंत नेल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील, रंजनभाऊ गिरमे, शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा, प्रदेश सल्लागार सावित्री महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,रणजीतसिंह शिंदे ,रमेश बारस्कर, शिवाजी कांबळे ,भारत शिंदे, निलेश गिरमे, प्रसाद डोके, राजकुमार हिवरकर, संतोष पाटील, मनोहर डोंगरे ,शंकरराव लिंगे ,प्रकाश गोरे, निशिगंधा माळी, पोपटराव बोराटे सरपंच नांदुर,योगेश पाटील , उमेश म्हेत्रे, सखाराम बोराटे, विकास टिळेकर यांचे सह संत सावता महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी ,साखरचंद लोखंडे महाराज ,आबासाहेब खारे ,नगरसेवक अजिनाथ माळी ,पांडुरंग शिंदे,सुर्यकांत गोरे यांचे सह जिल्हा तालुका कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि संत सावता महाराज भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता .
प्रारंभी मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीमध्ये संतश्रेष्ठ सावता महाराजांच्या चंदन उटीचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर
आयोजित कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संयोजक प्रभू महाराज माळी यांनी तीर्थक्षेत्राला अ वर्ग दर्जा आणि 100 कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल आणि सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्या म्हणून जयकुमार भाऊ गोरे यांना ग्रामविकास मंत्री आणि अतुलजी सावे यांना कॅबिनेट मंत्रीपदी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. हा कार्यक्रम चंदण ओटी सोहळा निमित्ताने संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी स्थळ अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आशी माहिती शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा यांनी माहिती दिली आहे