पारधी समाज हा भटका समाज अज्ञान आणि गुन्हेगारी साठी व वन विभाग या समाजास वन्य प्राण्यांच्या शिकारी साठी गुन्हेगार ठरवत आले आहे.
हा समाज ज्या ठिकाणी वस्ती करून रहातो त्यास बेडा पारधी बेडा म्हणून ओळखले जाते.मात्र त्यांना त्यांच्या वस्तीत मूलभूत सुविधा मिळत नाही.आर्णी नजीक दिग्रस रोड ला लागून काठोडा ग्रामपंचायत अंतर्गत पारधी बेडा आहे.
मागील महिन्यात हा काठोडा पारधी बेडा कु.वेदिका चव्हाण या १२ वर्षीय मुलीचा हंडाभर पाण्यासाठी नदी पात्रात पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे वेदिका चे मृत्यू प्रकरणाने हा बेडा चर्चेत आला होता. आदिवासी विकास मंत्री प्रचार्य अशोकराव उईके यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. माजी मंत्री वसंत पुरके यांनी येथे भेट देऊन सरकार विरुद्ध टीका केली होती.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी येथे भेट देऊन समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे सांगितले होते.विविध नागरी सुविधा नसल्याने चर्चेत आलेल्या पारधी काठोडा बेडा ६ जून ला रक्तरंजित घटनेने चर्चेत आला आहे.
बायकोच्या भावाला लोखंडी रोड व काठीने मारून ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास मृतक (साळा) गुडल्या नंदू पवार पारवा पारधी बेडा (२२ वर्ष) हा आपल्या बहिणीस भेटण्यासाठी काठोडा पारधी बेड्यावर आला होता.बहीण पूजा हिला भेटल्यावर त्याचा भावजी बहिणीचा नवरा मुकेश उदेभान पवार (३२) याने जुना वाद उकरून काढला व साळा नंदू च्या डोक्यावर लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली यात रक्ताच्या थारोळ्यात नंदू पडला व त्याचा मृत्य झाला.
ही घटना माहीत होताच आर्णी पोलीस घटनास्थळी पोहचले व त्यांनी लगेच आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली. अर्ध्या तासातच पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
यवतमाळ जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष गोयल.उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी भेट दिली मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आला असून पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी चे पोलीस निरीक्षक सुनील नाईक व सहकारी करत आहेत.