भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर धार्मिक आधारावर वेगळा देश निर्माण झालेल्या पाकिस्तान आजवर केवळ धार्मिक कट्टरता पसरविणे वदहशतवादी व आतंकवादी निर्माण करणे त्याना आश्रय देत भारतातील नागरिकांना त्रास देण्यात आपली शक्ती खर्च केली यात त्या देशात मूलभूत सुविधा शिक्षण आरोग्य व नागरी सुविधा निर्माण होऊ शकल्या नाहीत.
भारतात अनेक वेळा आतंकवादी हल्ले झाले पण पहलगाम येथे झालेल्या हल्यात निरपराध २७ पर्यटन ठार झाल्यावर देशात संतापाची लाट उसळली अन भारताने कारवाई सुरू केली.
पाकिस्तान पुन्हा फाळणीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची शक्यता दाट आहे. भारताला डिवचल्याचे गंभीर परिणाम पाकड्यांना भोगावे लागत आहे. अणुबॉम्ब ठेवलेल्या शहरांवर ड्रोन हल्ले झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तान पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे झेंडा उतरवण्यात येत आहेत. बलुचिस्तानमध्ये बंडाचे वारे वेगाने वाहत आहे. बलुचिस्तानमधील अनेक भूभाग बलुच आर्मीच्या ताब्यात आला. त्यामुळे एकीकडे आज झालेले १२ दहशतवादी हल्ले आणि त्यातच बलुचिस्तानमध्ये सुरू असलेली गडबड यावरून स्वतंत्र बलुचिस्तानची लवकरच घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीच्या (BLA) कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ३ मे २०२५ रोजी, BLA ने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील कालात जिल्ह्यातील मंगोचर हे शहर ताब्यात घेतले आहे. बीएलएने सरकारी इमारती आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करून त्यावर नियंत्रण मिळवले. BLA च्या ‘डेथ स्क्वाड’ ने शहरात अनेक ठिकाणी चेकपॉइंट्स उभारले आहेत…भारतीय सैन्य दल हे प्राणा ची बाजी लावत पाकिस्तान विरोधात लढत आहेत.