राज्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात प्रहार चे कार्यकर्ते पदाधिकारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात ज्यात दिव्यांगाचे प्रश्न शेतकरी प्रश्न,व रुग्ण सेवा अंतर्भूत आहे.विविध आंदोलनात देखील त्यांचा सहभाग असतो अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पक्ष प्रमुख बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात व संकल्पनेतून जिवा शिवा कार्यकर्ता सन्मान सोहळा ठेऊन त्यात विविध पुरस्कार देण्यात येतात सोलापूर येथे सोलापूर,धाराशीव लातूर चा सन्मान सोहळा पार पडला.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात येणारा संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान पुरस्कार रुई तालुका माढा येथील मा दीपक जगन्नाथ लांडगे यांना संत गाडगेबाबा सामाजिक पुरस्कार माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी दिपक लांडगे बोलताना असे म्हणाले की प्रहार जनशक्ती पक्ष माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्या समाजकार्याची दखल घेऊन खऱ्या अर्थाने त्यांना ऊर्जा, बळ देण्याचे काम करत आहे