चारुदत्त बागुल यांचे मरणोपरांत देहदान
यवतमाळ: आर्णी येथील अमरापुरा निवासी चारुदत्त बागुल यांचे 15 मे रोजी 11.58 वाजता येथील वसंतराव नाईक शासकीय रूग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्ष होते. त्यांनी दोन वर्षापुर्वी देहनाचा संकल्प एकता देहदान समितीच्या जिल्हा ध्यक्ष समिना खालीक शेख यांचेकडे रितसर फार्म भरून लेखी स्वरूपात केला होता. याला त्यांचा मुलगा तन्मय,दर्पण,मुलगी प्रनया व पत्नी प्रतिभा बागुल (गेडाम) यांनीही समर्थन दिले होते. आज दुपारी 4 वाजता शोक सभा घेऊन त्यांचा देह वसंतराव नाईक वैघकिय माहाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकता यावे व संशोधन करता यावे या उदात्त हेतुने शरीर रचना शास्त्र विभागाचे प्रमुख डाॅक्टर हर्षदा उघाड़े यांना देह स्वाधीन करण्यात आला. यावेळी तन्मय , दर्पण,पत्नी प्रतीभा गेडाम मुलगी प्रनया माजी मंत्री वसंत पुरके सर,युवा नेता जितेंद्र मोघे नातवंड अप्तगन देहदान समीतीच्या अध्यक्षा समीना शेख सचिव ,खालिक शेख , कबीर दरने सामाजसेवा अधिक्षक उपस्थित होते. बागुल यांचे बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना माहाराप्ट्र शासनाचा वांग्मय पुरस्कार १९८६ला पुणे येथे पोलिस हवालदारांची डायरी या पुस्तकाला मिळाला. तसेच त्यांचे उध्वस्त हे आत्मचरीत्र, तथा त्या दोघी, जगावेगळा ,चेलेन्ज अशे एकुण २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दुरदर्शनवर अनय हा नाटक गाजलेला आहे. क्राइम पेट्रोलमध्ये अनेक कथांचे सादरीकरण झालेले आहे. एकता देहदान समीती मागील २१ वर्षा पासुन हे कार्य करीत आहे आज पर्यंत पंधरा देहदान व दोन नेत्रदान समीतीच्या मार्फत करण्यात आले आहे,हे उल्लेखनीय बाब आहे.या समीतीच्या अध्यक्षा समीना शेख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी देहदान व अवयव दान, नेत्रदान करावे. भारतात नेत्रदान व मुत्रपिंडासाठी सुमारे अडीच लाख तर ह्रदय आणि यकृतासाठी प्रतेकी ५० हजार रुग्ण प्रतीक्षेत आहे, असे हृदयद्रावक वास्तव असतांनाही अवयवयथानाचा आकडा चिंताजनक परिस्थिति आहे. रोज कीतीतरी एक्सिडेंट होतात पण कुटुबियांचे योग्य समुपदेशन प्रभावीपणे होत नसल्यामुळे आज जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत देश ०.३४ व्या क्रमांकावर आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे. या साठी शासनस्तरावर ठोस पावले उचलणे तसेच समाजीक चळवळ प्रभावीपणे राबवीने गरजेचे असल्याचे मत पत्रकार चारुदत्त बागुल यांचे देहदान केल्या नंतर माध्यंमासी बोलतांना समीतीच्या अध्यक्षा समिना हाजी खालिक शेख यांनी व्यक्त केली.
