शेतकरी असो शेतमजूर असो की बांधकाम कामगार यांच्या हितासाठी महा युती सरकारने ऐतिहासिक योजना राबविल्या अगदी बांधकाम कामगारांना कामाचे सहित्य सुरक्षा किट,घरगूती जीवनावश्यक भांडी विमा,मुलांचे शिक्षण लग्न प्रसूती आदी साठी महायुती सरकार भरभरून देत आहे.मी आमदार नसून तुमचा सेवक आहे तुम्ही मला तुमच्या सेवेसाठी निवडले मी कायमस्वरूपी तुमच्या साठी झटत रहाणार असे प्रतिपादन आर्णी केळापूर चे लोकप्रिय आमदार प्रा.राजू भाऊ तोडसाम यांनी केले.
ते बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते पुढे ते म्हणाले की कामगारांच्या मदतीसाठी माझे भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते सेवेत आहेत त्यांना संपर्क साधा कुठल्याही प्रकारची लाच कोणाला न देता दलाला पासून सावध रहा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
मा.आमदार प्रा.श्री राजुभाऊ तोडसाम यांच्या हस्ते आर्णी तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्य(किचन सेट) चे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास बहुसंख्य कामगारांनी उपस्थिती दर्शवून योजनेचा लाभ घेतला.
या वेळी आपले मत व्यक्त करीत असतांना माननीय आमदार साहेबानी प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ हा तळागाळातील जणते पर्यंत पोहचविण्या करिता व या पुढेही जनतेचा सेवक म्हणून काम करीत राहणार असल्याचे नमुद केले.
यावेळी किसन राठोड ता अध्यक्ष भाजपा , प्रकाश राठोड मा.जी.प.सदस्य , साजिद बेग ,प्रियाताई तोडसाम, निखिल ब्राम्हणकर शहर अध्यक्ष भाजपा, विलास राऊत,दिगंबर बुटले, विशाल देशमुख,शाम लाड,मंगेश वानखडे ,प्रमोद आडे,राजेश माहेश्वरी ,उमेश राठोड,किसन लाडके,गटविकास अधिकारी राजेंद्र खरोडे ,ठाणेदार सुनील नाईक व भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते