अमृत योजनेचाच वाटेवर यवतमाळ ची भूमिगत गटारी योजना… शहराध्यक्ष, प्रा. बबलू देशमुख.
यवतमाळ दि.24 (शनिवार)
यवतमाळ शहरात चालू असलेले अंदाजे 1200 कोटी रुपयाची भूमिगत गटारी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम यवतमाळ शहरात काही भागात चालू आहे. गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे भूमिगत गटारी योजनेची पोलखोल झाली आहे. ज्या भागातही काम चालू आहे त्या भागातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या यवतमाळ मधील लोहारा,वडगाव,उमरसरा, या भागात भूमिगत गटार योजनेचे काम चालू आहे. हे काम चालू असताना निकषाप्रमाणे कुठल्याही प्रकारचे काम ही एजन्सी करत नाही आहे. या कामावर लक्ष देण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी आणि ठेकेदार मिळून या योजनेची संपूर्ण विल्हेवाट लावून शहराची विल्हेवाट लावल्या जात आहे.सध्या यवतमाळतील लोहारा,वडगाव,उमरसरा या परिसरात या योजनेचे काम पाऊस सुरू असताना सुद्धा चालू आहे त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या योजनेचे काम करत असताना जी निकष पाळली जायला पाहिजे होती ती कुठलीच निकष पाळल्या जात नाही आहे.त्यामुळे शासनाचा पैसा बरबाद होतो की काय अशी शंका यवतमाळकर नागरिकांना येत आहे ज्याप्रमाणे अमृत योजनेची स्थिती यवतमाळ मध्ये झाली त्याच पावलावर ही योजना निघालेली आहे. पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळ्यापूर्वीचे कुठलेही नियोजन ही योजना करीत असलेल्या कंपनीने केलेले नाही आहे. ज्या भागात या योजनेचे काम चालू आहे त्या भागातील नागरिकांना घरापर्यंत पोहोचणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्यांच्या वाहनांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांनी रात्री वाहने कुठे ठेवावी तसेच त्या भागात गाडी चालवत असताना महिला, विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक आणि सर्वांचाच प्रश्न निर्माण झालेला आहे संपूर्ण रस्त्यावर काळी माती पसरली आहे. त्यामुळे गाडी चालवणं तर शक्यच नाही साधी ढकलत ही नेने अशक्य झालेले आहे.अशा वेळेस खूप ठिकाणी लोक गाडी स्लीप होऊन पडत आहे.त्यांना दुखापती होत आहे यातून एखादी मोठी दुर्घटना ही होऊ शकते या निवेदनाच्या माध्यमातून शहर काँग्रेस कमिटीने माननीय जिल्हाधिकारी यांना नम्र विनंती केली आहे की आपण स्वतः या कामावर येऊन प्रत्यक्ष काम कसे चालू आहे याची पाहणी करावी व पावसाळ्यामध्ये या योजनेचे काम बंद करून ज्या ज्या ठिकाणी कामे झाली त्या रस्त्याचे कामे त्वरित चालू करून नागरिकांना आपल्या घरापर्यंत येण्या जाण्यासाठी व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे. तसेच जर या आठ दिवसात ही उपाययोजना झाली नाही तर या परिसरातील नागरिक व शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी प्रशासनाच्या विरोधात तसेच अधिकाऱ्यांच्या विरोधात लढा उभारण्यात असल्याचे सांगितले आहे.
हे निवेदन देताना शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रा. बबलू देशमुख, सभापती रवींद्र ढोक, युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस शिनू अण्णा नालामावर, मा. नगर सेवक जावेद भाई अन्सारी, मा नगरसेवक छोटू भाऊ सवई, बबली भाई, मिलिंद डेरे,अशोक पुसदकर, कृष्णा पुसनाके, सुरज बोढे, श्रीकृष्ण हिंगासपुरे, मनोज नवदुर्गे, बालु काळे,कैलाश सुलभेवर, मुकुंद ठाकरे, किशोर गजभिये, पंजाबराव चव्हाण, सुनील तांबेकर, रामराव पवार, रमेश पटले, सिद्धार्थ चौधरी, विजय सेंगर, स्वप्नील कदम, प्रमोद काळे मंगेश दहिकर, संजय परमा, गजानन पेठकर, विजय इंगोले, आशिष पांचोरे,संजय गुल्हाने विनोद तायडे व परिसरातील नागरिक तथा कार्यकर्ते उपस्तित होते.