वैभव सूर्यवंशी हा १४ वर्षीय क्रिकेटपटू फलंदाज २०२५ च्या आय पी एल मोसमात राजस्थान संघा कडून खेळतांना तडाखेबंद फलंदाजी करून जगाचे लक्ष वेधले.
भारतीय १९ वर्षा खालील संघ इंग्लड च्या दौऱ्यावर आहे.त्या भारतीय संघात वैभव सूर्यवंशी देखील आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धा गाजवणारा वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्येही आपल्या आक्रमक फलंदाजीने कहर करतोय. भारताचा १९ वर्षांखालील संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेतील दुसरा सामना नॉर्थॅम्प्टनच्या मैदानावर पार पडला. सलामीला आलेल्या वैभवने ३४ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. यादरम्यान वैभव बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजाने त्याला डिवचलं.
वैभवने नेहमीप्रमाणेच आक्रमक खेळी केली. त्याने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४५ धावा चोपून काढल्या. वैभवची ही खेळी पाहता वाटलं होतं की, भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारणार. मात्र, अर्धशतकाच्या जवळ असताना वैभवच्या खेळीला पूर्णविराम दिला. ११ व्या षटकात इंग्लंडचा गोलंदाज जॅक होमने वैभवला घरचा रस्ता दाखवला.
वैभव बाद होऊन माघारी जात होता, इतक्यात इंग्लंडच्या गोलंदाजाने त्याने डिवचलं. जॅक होमने त्याला ड्रेसिंग रुमममध्ये जाण्याचा इशारा केला. होमने असं सेलिब्रेशन करणं साहजिक होतं. कारण वैभवने त्याच्या गोलंदाजीवर चांगल्याच धावा गोळा केल्या. वैभवने होमचे ८ चेंडू खेळून काढले. यादरम्यान त्याने १८ धावा चोपल्या. शेवटी तो होमच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला यावरून गोर्याया वैभव ची किती धास्ती आहे हे लक्षात येते.