शासकीय जमिनीवरअतिक्रमण करणे जलाल खेडा येथील सरपंचाला भोवले..
मयूर सोनोने उपसरपंच जलालखेडा यांनी अपर जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे जलाल खेडा येथील सरपंच श्री कैलास निकोसे यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग च्या शासकिय भूखंडावर अतिक्रमण केल्या बाबत तक्रार दाखल केली होती,
सरपंच जलाल खेडा यांनी शासकीय भुखंडावर दुकान बांधून अतिक्रमण केलं आहे ही बाब अप्पर जिल्हाधिकारी यांचे कडे सिद्ध झाली आहे.
सदर सरपंच हे लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे बेकायदेशीर अतिक्रमण करुन सदर शासकिय भुखंड अवैधरित्या ताब्यात ठेवण्याचा अधिकार त्यांना नाही आहे.
उलट शासकिय नियमानुसार जर गावातील कोणत्याही शासकिय भुखंड वर कोणताही व्यक्ती अतिक्रमण करीत असले तर त्या व्यक्तीला त्या पासून रोक थाम करण्याचे काम सरपंचाचे आहे. परंतु सरपंच हा स्वतः लोक प्रतिनिधी असून जर ते स्वतः शासकिय भुखंडावर अतिक्रमण करुन सदर जागा दुष्ट हेतूने हडप करण्याच्या उद्देशाने ताबा केला आहे. म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनिय कलम 14 (1)(ज) अन्वये सरपंच जलालखेडा यांना मा. अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांनी अपात्र घोषित केले आहे.
यामध्ये तक्रारकरता मयूर सोनवणे यांच्यातर्फे एड. तावीर शेख आणि वाजेद शेख यांनी कायदेशीर बाजू मांडली आहे. अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांनी युक्ती वाद मान्य करून सरपंच जलाल खेडा यांना अपात्र केलं आहे.