7k Network

काव्या देशमुख शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवी ; जिल्ह्यात पहिली..

काव्या देशमुख शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवी ; जिल्ह्यात पहिली.

तांबवे टें ता.माढा येथील रहिवासी व आदर्श पब्लिक स्कुल कुर्डूवाडी येथील विद्यार्थिनी काव्या निलेश देशमुख हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत २९८ पैकी २८६ गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक व सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. यावर्षी राज्यातील ५ लाख ४७ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा परीक्षा दिली होती. काव्याला आई सोनाली देशमुख, वडील मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, शिक्षिका सुरेखा कांबळे, स्वाती खटके, शिक्षक तानाजी खरात, समाधान व्यवहारे, नवनाथ धांडोरे यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे तिची यावर्षी नवोदय विद्यालय, पोखरापुर व शासकीय सैनिक स्कूल साठीही निवड झाली आहे.तिने यावर्षी मिळवलेल्या तिहेरी यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. काव्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचा मनोदय व्यक्त केला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार अभिजित पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, युवक नेते रावसाहेब देशमुख, आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष अमोल सुरवसे, संचालिका पुजा सुरवसे, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, गटविकास अधिकारी महेश सुळे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, माजी विस्तार अधिकारी शोभा हंडे, केंद्रप्रमुख संजीवनी उबाळे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दिनेश जगदाळे, विभागीय अध्यक्ष किरण घाडगे,जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बागल, तांबवे टें गावचे माजी सरपंच राजाभाऊ खटके, उद्योजक गोरख खटके, नागेश खटके, सरपंच सचिन कांबळे, तडवळेचे सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ परबत, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख,डॉ.बालाजी शिंदे, डॉ. संग्राम परबत, बाळासाहेब वागज, शिवाजीराव कदम,विशाल नाईक, राहुल कांबळे, शिवानंद बारबोले,दत्तात्रय गरदडे, शंकर नागणे यांनी अभिनंदन केले.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!