आर्णी नगरपरिषद प्रशासन अतिक्रमण धारकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या लोकांचे मनसुबे मजबूत होत असून यात काही काळ बेर तर नाही ना अशी शंका नागरिक आता घेत आहेत.
सिसोदिया ले आऊट कडे जाणार व रस्ता अतिक्रमण केल्याने अरुंद झाला हा रस्ता मोकळा करावा म्हणून शेकडो नागरिक महिला पुरुष व बालकांनी आंदोलन केले निवेदन दिले, मोर्चा काढला व गेली १५ दिवस साखळी उपोषण सुरू केले मात्र तरीही नगरपरिषद प्रशासन कुंभकर्ण झोपेत आहे की झोपेचे सोंग घेत आहे.अगदी कोणालाच न जुमाणणार्या नगरपरिषद प्रशासनास कुठले पाठबळ आहे हा संशोधनाचा विषय आहे.
आर्णी येथील बोरकर ले आऊट कडून मस्जिद कडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला या संदर्भात नगरपरिषद ला तक्रार देऊन देखील कारवाई तर दूरच तक्रारदार व्यक्तीस नोटीस देऊन गरपरिषद प्रशासन अतिक्रमण धारकाच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे उलटा चोर कोतवाल को डाटे असा प्रकार असून त्यामुळे तक्रारदार नागरिकाचे खच्चीकरण होत आहे.