शिवसेना शिंदे गटात काँग्रेस भाजप च्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
कळंब:-तालुक्यातील काँग्रेस, भाजप या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी विश्रामगृह यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
यामध्ये तालुक्यातील बोरी महाल येथील ग्रामपंचायत सदस्य,माजी सरपंच,माजी उपसरपंच,आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी विभागीय समन्वयक पराग पिंगळे,संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार,श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, , उपजिल्हाप्रमुख सचिन महल्ले, तालुकाप्रमुख अभिषेक पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुका स्तरावर पक्ष बांधणी करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने कळंब तालुक्यात तालुकाप्रमुख अभिषेक पांडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. यावेळी मेंढला पंचायत समिती सर्कल मधील बऱ्याच मान्यवरांनी पक्षप्रवेश केला. त्यामध्ये आशिष कुंभारे, नामदेव डोंगरकर, देवानंद झांबरे, सौ. वंदना गायकवाड, नरेश राजनहिरे आदी काँग्रेस व भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधले
