आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला प्रभावी होऊन विविध पक्षातील पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.कुठल्याही परिस्थितीत यवतमाळ जिल्हा परिषदवर व बहुतांशी पंचायत समिती व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकावा म्हणून जिल्हा पदाधिकारी व पश्चिम विदर्भ समनव्यक पराग पिंगळे हे अथक परिश्रम घेत आहेत.
यवतमाळ येथे नेर व महागाव तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीस ना.संजय भाऊ राठोड यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पश्चिम विदर्भ समन्वयक परागभाऊ पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख हरिहरभाऊ लिंगनवार, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, जेष्ठ नेते जीवनदादा पाटील, शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशालीताई मासाळ, माजी नगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल, भाऊराव ढवळे, उपजिल्हाप्रमुख डॉ. बी. एन. चव्हाण, नेर तालुकाप्रमुख मनोज नाल्हे, महागाव तालुकाप्रमुख राजू राठोड, विभागप्रमुख अमोल जाधव, परमेश्वर जाधव, युवासेना विभाग प्रमुख संतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना पक्षात प्रवेश करणारे मुख्य पदाधिकारी सोनवाढोणा सरपंच नरेंद्रभाऊ राठोड, नेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अजिंक्यभाऊ मासाळ, सोनवाढोणा /मालखेड सोसायटी अध्यक्ष उत्तमराव अगलधरे, पिंपळगाव (डुब्बा) येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते शामभाऊ देवकाते, वटफळी/वटफळा उपसरपंच तथा नेर तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष पियुष काळमेघ, नेर तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस सतीश उर्फ गोलू भोयर,( उदापूर), दिग्रस तालुका सोशल मीडिया काँग्रेस अध्यक्ष मुकुंद खांदवे पाटील रा. आमला ता. दिग्रस, बोंडगव्हाणचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते संजयजी राठोड, महिला काँग्रेस नेर शहराच्या शहर अध्यक्षा ज्योतीताई अथीलकर, नेर येथील सामाजिक कार्यकर्ते बालू पाटील येवले, माजी नगरसेवक विनोद जयसिंगपुरे, गजानन दहेलकर,
नेर तालुक्यातून उपसरपंच अनिलभाऊ मातकुटे (सोनवाढोना), ज्येष्ठ कार्यकर्ते केदारेश्वर काका हरडे, ग्रामपंचायत सदस्य मारुतीभाऊ आडे (सोनवाढोना), वरिष्ठ कार्यकर्ते सदाशिवराव चव्हाण, दुलीचंदजी राठोड, ग्रामपंचायत सदस्य योगेश महाजन (सोनवाढोना), ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते भाऊ चव्हाण, धनराज पवार, दिनेश आडे, नितीन राठोड, माणिक पवार, दिलीप राठोड, सुनील ठाकरे, राम आडे, रमेश आडे, प्रवीण मानकुटे, शाखा अध्यक्ष मनोहर पवार, मातीक राठोड, किरण जाधव, यशवंत मातकुटे, महिला काँग्रेस नेत्या नंदाताई गजबे, सपनाताई अहिरे, महिला आघाडी नेरच्या शशिकलाताई नागरीकर, माजी शहरप्रमुख कल्पनाताई ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
महागाव तालुक्यातून अमरसिंग जाधव महाराज, ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर जाधव, गजानन राठोड, दिगंबर रोकडे, प्रदीप चव्हाण, कैलास राठोड, चंद्रकांत गायकवाड, अमोल हंगे, आकाश गायकवाड, सुधाकर राठोड, शंकर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शाखाप्रमुख संजय आडे, शिवाजी काचेवाड, माजी सरपंच दिनेश राठोड, उपतालुकाप्रमुख अनंता आढाव, शेख अली, साहेबराव राठोड, प्रमोद कांबळे, संतोष वाघमारे, आकाश राठोड, दीपक राठोड, शेख मुराद, उत्तम खरे, पंजाब तायडे, फकीरा जोगदंडे, संतोष कांबळे, भगवान आढाव, तारेश्वर राऊत, जयसिंग जाधव, इंदल पवार, रामेश्वर राऊत यांनी प्रवेश केला.
कळंब येथील मा. ग्रा.स. आशिष कुंभारे, माजी उपसरपंच देवानंद झामरे, प्रतिष्ठित नागरिकबोरीमहाल नामदेव डोंगरकर, ग्रामपंचायत सदस्य नरेश राज आणि माजी सरपंच वंदनाताई गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला.