7k Network

महागाव तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी यांनी शिवसेनेत केला प्रवेश…!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यवतमाळ जिल्ह्यात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यवतमाळ महागाव तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी यांनी य पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.केला

काल दिनांक २८ रोजी यवतमाळ येथे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते महागाव तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीस पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पश्चिम विदर्भ समन्वयक परागभाऊ पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख हरिहरभाऊ लिंगनवार, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, जेष्ठ नेते जीवनदादा पाटील, शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशालीताई मासाळ, माजी नगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल, भाऊराव ढवळे, उपजिल्हाप्रमुख डॉ. बी. एन. चव्हाण, नेर तालुकाप्रमुख मनोज नाल्हे, महागाव तालुकाप्रमुख राजू राठोड, कळंब तालुकाप्रमुख अभी पांडे, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका लक्ष्मीताई पारवेकर, विभागप्रमुख अमोल जाधव, परमेश्वर जाधव, प्रवीण पुंडे, सोबिन चव्हाण विनोद जगताब,माजी उपसरपंच संतोष राठोड ,आदी मान्यवर उपस्थित होते
महागाव तालुक्यातून तीवरंग येथील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व माजीसरपंच दिनेश राठोड, अमरसिंग जाधव महाराज, आमणी (खु) येथील ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर जाधव, ग्रा.प सदस्य गजानन राठोड, दिगंबर रोकडे, प्रदीप चव्हाण, कैलास राठोड, चंद्रकांत गायकवाड, अमोल हंगे, आकाश गायकवाड, तसेच कोठारी येथील सामाजिक कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुधाकरभाऊ राठोड, शंकरजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शाखाप्रमुख संजय आडे, राहूर येथील माजी सरपंच राजाभाऊ दत्तराव कदम शिवाजी काचेवाड, हीवरा सर्कलचे अनंता आढाव, शेख अली, साहेबराव राठोड, प्रमोद कांबळे, संतोष वाघमारे, आकाश राठोड, दीपक राठोड, शेख मुराद, उत्तम खरे, पंजाब तायडे, फकीरा जोगदंडे, संतोष कांबळे, भगवान आढाव, तारेश्वर राऊत, जयसिंग जाधव, इंदल पवार, रामेश्वर राऊत यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला..!

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!