दारू किंवा कुठलंही व्यसन वाईटच पणदारू च्या संदर्भात माजी मंत्री भजप नेत्या त्यांच्या एका वक्तव्या ने पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
राजकारणात चर्चेत रहाण्यासाठी कुठलं ना कुठलं वक्तव्य केले जातं मग भलेही ते वादग्रस्त का असेना. २०१४ नंतर माजी मंत्री पंकजाताई मुंडे ह्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर त्या भाजप वर नाराज असल्याची चर्चा होत होती.तर कधी त्या दुसऱ्या पक्षात प्रवेश घेतील का असा अंदाज कधीकधी बांधला जात असे.दसरा मेळाव्यातील पंकजाताई याचा विधाना कडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले असते.
यावेळी मात्र स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी त्यानी कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शन भाषणातील दारू संदर्भातले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
दारु प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, तंबाखू- पुड्या खाणं बंद करा, असा सल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी बीड, परळीमध्ये विविध उपक्रमाचे उद्घाटन केले.
दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका.त्याने विष बाधा होते.पिण्याला मी नाही म्हणत नाही. तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा आणि खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तंबाखू-पुड्या खाऊन तुम्ही मंदिराजवळ थुंकता, कसं दिसते ते. यापुढे तंबाखू-पुड्या खाऊ नका. तसेच चांगलं चांगलं खा. मास मच्छी व्हेजिटेरियन खा आणि आरोगी रहा असा सल्ला देखील पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करताना पंकजा मुंडे बोलत होत्या.