सरकारने गुटखा बंदी चा कायदा केला अन पोलिसांचा एक हप्ता वाढला….
सरकारने नवा कायदा केला की पोलिसांचा हप्ता वाढला म्हणून समजाच जर पोलिसांनी ५० लाख रुपये जप्त केले तर जप्तीत मात्र ५० हजार दाखवतात जगाच्या पाठीवर सर्वात भ्रष्टाचार पोलीस करतात ते जर इमानदारीने त्यांचे कर्तव्य पार पाडत असले असते तर सर्व घाण साफ झाली असती असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी बुलढाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते.
आमदार संजय गायकवाड त्यांच्या बिनधास्त व कधी कधी बेताल वक्तव्या साठी प्रसिद्ध आहेत.अनेकवेळा ते शिवसेना उबाठा वर टोकाची टीका करत असतात.
यावेळी मात्र पोलिसां च्या कार्यप्रणाली वर शंका उपस्थित केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाले आहेत कारण गृह खाते त्यांच्या कडे आहे.देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून एकनाथ शिंदे यांना सांगितले असून समज द्या अन्यथा यापुढे कारवाई करू असे सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोलिसांची बाजू घेत आमदार गायकवाड यांचे कान उघडनी केली.यानंतर आमदार गायकवाड यांनी माझे वक्तव्य खरे असून आपण स्थानिक पोलिसां बद्दल हे वक्तव्य केले असून त्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. जर माझ्या वक्तव्यामुळे पोलिसांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे हे आज आभार सभेच्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
