हर घर जल म्हणून कोट्यवधी रुपये जाहिरातीत चुराडा करून जलजीवन मिशन च्या योजनेचा मोठा गाजावाज करण्यात आला पण अजूनही कुठल्याही गावात योजनेचे पाणी सुरू झाले नाही केवळ पिण्याच्या पाण्याचे राजकारण करून भाजप ने बोभाटा केला असा घणाघाती आरोप करून आर्णी तालुक्यातील जलजीवन मिशन कामांचा चांगलाच क्लास वणी आर्णी चंद्रपूर च्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी घेतला.
आर्णी पंचायत समिती च्या सभागृहात खा.प्रतिभा ताई धानोरकर यांनी तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागाचा आढावा घेतला.
या वेळी जलजीवन चे कामे सर्वत्र रखडले असून भाजप कडे योजनेसाठी निधी च नाही त्यामुळे कंत्राटदार काम करत नाही दोन वर्षांपासून ही कामे रखडली आहे.
अनेक गावांत चांगले सिमेंट चे रस्ते जलजीवन योजनेच्या कामासाठी फोडले त्याचा लोकांना त्रास होत आहे योजना पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याची डागडुजी करता येणार नाही.
सरपंच मंडळींना दिला सल्ला:
जलजीवन मिशन चे काम तपासून घ्या मगच काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्या अन्यथा काही देऊन घेऊन प्रमाणपत्र देऊ नका असा सल्ला खा.प्रतिभाताई यांनी उपस्थित सरपंच मंडळींना दिला त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.
अरुणावती कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण झाल्या शिवाय टेल एन्ड ला अरुणावती प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही तेव्हा अस्तरीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत हा मुद्दा माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांनी उपस्थित करून त्यासाठी आपण जलसमाधी आंदोलन केले होते याची आठवण करून लेखी आश्वासन देऊन देखील काम झाले नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
शेलु (शेंदूरसनी) येथील घरकुल व सिंचन विहिरीचा मुद्दा गाजला
या बसिठकीत शेलु (शे.)येथील सरपंच व सचिव राजकारण करतात त्यांनी लाभार्थी हरून कुरेशी यांस दिलेल्या मानसिक त्रासा मुळे त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा गुलशन याने सांगितले तेव्हा खासदार प्रतिभाताई संतापल्या उपस्थित ग्रामसेवकास त्या म्हणाल्या तुम्हाला राजकारण करायचे असेल तर नोकरीचा राजीनामा द्या.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र जसे चिखली (इ) येथे इमारत होऊन आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी नाही असा मुद्दा पिंटू चौधरी यांनी मांडला
तर परसोडा येथे आरोग्य केंद्र मंजूर आहे पण आरोग्य विभाग जागा पाहण्यासाठी येत नाही आमच्या गावाला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला असून आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी आता आम्ही काय भाजप मध्ये प्रवेश घेतला पाहिजे का असा उपोरोधीक सवाल माजी सरपंच अतुल देधमुख यांनी उपस्थित केला.
यवतमाळ जिल्हाकाँग्रेस कमेटी चे सरचिटणीस ऍड प्रदीप वानखडे यांनी शेलु (शे.) रानीधानोरा येथील आरोग्य केंद्र व जागेच्या आठ अ बद्दल मुद्दा मांडला.या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी अशा सूचना खासदार धानोरकर ताई यांनी केल्या.
आर्णी शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम ९५% पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तेव्हा आर्णी नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष राजीव विरखेडे यांनी खोटी व चुकीची माहिती देऊ नका असे खडसावले.
आर्णी शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा मुद्दा आर्णी शहर काँग्रेस चे अध्यक्ष अमोल मांगुळकर यांनी मांडला.
यावेळी शेत पांदण रस्त्यांची माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंता पाटील यांनी दिली.तर तक्रारी मुळे दोन वर्षांपासून नवीन मनरेगा ची विकास कामे सुरू नाहीत तसा प्रस्ताव शासनास तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी पाठवण्याच्या सूचना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केल्या.
ग्रामीण रुग्णालयात दुरवस्था:फारुख धारिवाला यांनी ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे औषध साठा नसतो व वैद्यकीय अधिकारी उपस्थित रहात नाहीत असे सांगितले
तर आर्णी ग्रामीण रुग्णालयात शिशु प्रसूती च्या सुविधा उपलब्ध करून दया अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रंजना आडे यांनी केली.
आजच्या आढावा बैठकीला माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार ,काँग्रेस चे युवा नेते जितेंद्र मोघे,आर्णी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अरीज बेग, आर्णी पंचायत समिती माजी सभापती राजीव विरखेडे , ऍड प्रदीप वानखडे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई ऐंडे,छोटू देशमुख,माजी नगरपरिषद उपाध्यक्षा नीताताई ठाकरे,खुशाल ठाकरे,मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक राजेंद्र गावंडे, प्रसेनजीत खंदारे दीपक देवतळे,संजय राऊत,वरुड भक्त चे सदस्य माजी सरपंच सुरेश काळे,निलेश आचमवार,उमेश आचमवार,लोनबेहळ चे सुनील राठोड व तालुक्यातील सरपंच मोठया संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी उपविभागीय अधिकारी पावरा,तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, पोलीस निरीक्षक सुनील नाईक, गटविकास अधिकारी रमेश खारोडे,सावळी वनपरिक्षेत्र अधिकारी सी एस गावंडे,पंचायत विस्तार अधिकारी इंगोले,मनरेगा सहायकअधिकारी अमीर खान
अनिल आड़े सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी सुनील भारती तालुकाध्यक्ष काँग्रेस, विजय पाटिल राउत माजी सभापती आर्णी पंचायत समिती,संजय ठाकरे, उमेश कोठारी, शिवसेना उबाठा शहरप्रमुख पंकज शिवरामवार,समीना शेख, उमेश ठाकरे, शिवरामवार सर, किसन पवार काका, घाटंजी चे माजी पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड, मोहोड सर, दिलीप चव्हाण, वाल्मीक पवार, मधुकर ठाकरे, सूर्यकांत जयस्वाल, गजानन राठोड़, दीपक देवतळे, प्रदीप जाधव, अमित पवार, दिनेश ठाकरे, नरेश राठोड़, सुनील राठोड़, दिनेश चौधरी, उमेश भोयर, पिंटू राउत, अशोक चव्हाण, शहीद रयानी, बालासाहेब शिंदे, आमीन भाटी, पिंटू चौधरी, उमेश आचमवर, शिरीष चिंतावार, खुशाल ठाकरे, जाकिर सोलंकी,अशोक अग्रवाल, सुभाष पवार, संतोष ढोले, फारूक धारिवाला, विनोद पंचभाई, अनिल चौधरी, सतीश धाये, सत्यजीत देवस्थले, अमोल वारंगे.
व इतर उपस्थित होते.