7k Network

अज्ञात मारेकऱ्यां कडून युवतीचा गळा चिरून हत्या

धुळे शहरातील नकाने परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बालाजी नगर येथे एका युवतीची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २२) सांयकाळी उघडकीस आली आहे यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास करत आहेत.
निकिता पाटील (वय २२) असे या मृत युवतीचे नाव आहे. धुळे शहरातील नकाने रोड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या बालाजी नगर येथे ही मृत युवती वास्तव्यास होती. ती महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घरी एकटी असल्याचे संधी साधत अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात शिरून गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तिची निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही दुर्देवी झाली त्यावेळी निकिताचे आई-वडील आणि भाऊ हे तिघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. घटनेबाबत माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. पोलिसांना माहिती समजल्यानंतर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

निकिता कल्याण पाटील या युवतीची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके पाठवली आली आहेत. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकाकडून पुरावे गोळा करण्यात आले आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.एकंदर या घटनेचा पोलिसांनी छडा लावा ही मागणी होत आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!