7k Network

‘पनौती’ नंतर आता ‘पापी’ संपता संपेना विश्वकप पराभवाचे पारायण…

विश्वचषक २०२३ ला सलग दहा सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा पराभव अंतिम सामन्यात अस्ट्रेलिया विरुद्ध गुजरात अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पराभाव झाला होता हा सामना पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.

सामन्यातील पराभवा नंतर सोशिअल मीडियातून पनौती हा ट्रेंड चालून पंतप्रधान मोदींनी ट्रोल करण्यात आले होते. हाच धागा पकडत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पी एम म्हणजे पनौती मोदी असा उल्लेख केल्याने काँगेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता.तत्पुर्वी नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना मूर्खओ का सरदार म्हणत टीका केली होती…हे सर्व शांत होत नाही तोच पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.

विश्वचषकाची फायनल कोलकात्यात झाली असती तर टीम इंडिया जिंकली असती, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकात पापी उपस्थित असलेला एक सामना वगळता सर्व सामने

ममता इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी टीम इंडियाच्या जर्सीवरून भाजपवर निशाणा साधला. ममता म्हणाल्या- भगवा हा संन्याशांचा रंग आहे, पण तुम्ही भोगी आहात

 

ममता यांनी पुढील महिन्यात पंतप्रधानांची भेट घेण्याची वेळ मागितली

डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेटीची वेळ घेणार असल्याचं सीएम ममता यांनी सांगितलं. परवानगी न मिळाल्यास दिल्लीत आंदोलन करणार आहेत.

बंगालमध्ये बेरोजगारी वाढवल्याचा केंद्र सरकारवर आरोपकेंद्र सरकार बंगालमध्ये बेरोजगारी वाढवत असल्याचा आरोप ममता यांनी केला. बंगालमध्ये बेरोजगारी 40% कमी झाली आहे पण सरकार हे सत्य लपवत आहे. ममता म्हणाल्या की, बंगालमधील सर्व मेट्रो स्टेशनही पूर्णपणे बदलले आहेत. सर्व आरोग्य केंद्रांना भगवा रंगवावा लागेल, अन्यथा निधी दिला जाणार नाही, असे पत्र राज्य सरकारला पाठवण्यात आले आहे.  यावेळी ममता दीदींनी केंद्रावर हल्ला चढवला केंद्र सरकार जीएसटीच्या नावाखाली सर्व कर वसूल करते, असे ममता यांनी उपरोधिकपणे सांगितले. बाबूंच्या नावावर स्टेडियम होईल, जमिनीची मालकी असेल, पुतळा उभारला जाईल. स्नानगृह बनवण्यासाठीही बाबूचे चित्र असणे आवश्यक आहे.

 

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!