अंबड जालना नंतर दुसरी ओबीसी महा सभा होत आहे.त्या सभेस। भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई मुंडे, शिवसेन्स एकनाथ गटाचे मंत्री संजय राठोड समदार संतोस बांगर यांच्या उपस्थिती कडे विद्वजेश लक्ष असणार आहे.
हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर या ओबीसींच्या महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मेळाव्यासाठी चार लाखांपेक्षा अधिक ओबीसी बांधव एकवटणार असल्याने, आयोजकांकडून पार्किंग, नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवारी सकाळी 11वाजता ओबीसी एल्गार महामेळावा होणार आहे. यासाठी लाखो ओबीसी बांधव येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (ता. 23) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. सचिन नाईक, अॅड. रवी शिंदे, सुरेशआप्पा सराफ, डॉ. नागोराव जांबुतकर, उमेश गोरे उपस्थित होते.
यावेळी अॅड. रवी शिंदे यांनी सांगितले की, हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्याचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे राहणार आहेत.
मार्गदर्शक म्हणून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री संजय राठोड, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजीमंत्री महादेव जानकर, माजीमंत्री विनय कोरे, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजीमंत्री विजयराव चौगुले, शब्बीर अहमद अन्सारी, कल्याण दळे, लक्ष्मण गायकवाड, माजी खासदार विकास महात्मे, पल्लवी रेणके, महंत सुनील महाराज, हरिदास भदे, प्रा. श्रावण देवरे, प्रा. लक्ष्मण हाके, प्रा. टी. पी. मुंडे, आमदार संतोष बांगर, आमदार प्रज्ञा सातव, आमदार इंद्रनील नाईक, निलय नाईक, प्रदीप नाईक आदींची उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख अतिथी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बी. डी. चव्हाण, डॉ. नागोराव जांबूतकर, हकीम बागवान, चंद्रकांत लव्हाळे, बी. डी. बांगर, विठ्ठल गाभणे, पंकज होडबे, केशव मस्के, साहेबराव मस्के, अशोक ठेंगल आदींनी केले आहे.